Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल. सदर वेबसाईट व्हाट्सअप नंबर 15/10/2019, 12.00 A.M पासुन लाईव्ह झाली आहे."

slide show

WhattsApp Status For You


Click ->
Click ->

karj hve! aamdar vha, binvyaji 30 lakh milva

कर्ज हवे! आमदार व्हा, बिनव्याजी ३० लाख मिळवा 


 

तर मित्रांनो अशी वेळ कुणावरच कधी येऊ नाही, एकदा मी पुण्या वरुण दादरला फोर व्हीलर मधुन चाललो होतो,अचानक चिंचवड चौकात एका व्यक्तिने घाई घाई ने हात केला, चेहरा जरा ओळखीचा वाटला, म्हणुन मी गाडी थांबवली तर काय आपले आमदार साहेब, घाम पुसत मला हात जोडुन म्हणले लिफ्ट देता का मला मुंबईपर्यंत अधिवेशनाला जायचं आहे,

 

मी दादरला चाललोय सांगितल्यावर म्हणले, दादर पर्यंत दिली तरी चालेल, मग मी काय दिली लिफ्ट, म्हटलं बसा. गाडीत  बसल्यावर आमच्या गप्पा चर्च्या मारायला सुरवात झाली. मला वाटलं त्यांची गाडी बहुदा खराब किंवा पंचर झाली असावी, म्हणुन मी त्यांना विचारले साहेब गाडी खराब झाली का, पंचर. तेव्हा त्यांनी मला सांगितले, त्यांच्याकडे गाडी नाही म्हणून ते असे  नेहमी लिफ्ट मागुन ये जा करतात. मला तर धक्काच बसला. एवढा मोठा आमदार आणि त्याच्या कडे साधी गाडी नाही. असे अनेक विचार माझ्या मनात येत होते. 

चालत असताना लोणावळा यायला  २०-२५ किलोमीटर चे अंतर बाकी होते तेवढयात आम्हाला  रस्त्याने दोन इसम चालत चालले असल्याचे दिसले, आमदार साहेब मला बोलले कि Please, त्या दोघांना लिफ्ट देता का, ते बिचारे पायीच चालले आहे आणि आपल्या गाडीत जागा पण आहे, आम्ही गाडी थांबवली, आमदार साहेब त्यांना बोलले "आज पायीच?""हो, कोणी लिफ्टच देईना आणि पैसे पण नाहीत खिशात, अधिवेशन महत्वाचंजनतेचे प्रश्न महत्वाचे, उशीर नको म्हणून निघालो पायीच"मग बसा गाडीत चला लवकर उशीर होतोय, आणि ते दोघे इसम घाई घाई ने गाडीत बसले. गाडीत बसल्यावर त्यांना असे वाटत होते कि ते जसे एखाद्या विमानातच बसले कि काय असे त्यांचे हावभाव होते मला जरा ऑड फील झाले पण काय करणार? 

[खरंच देव आहे का ? ]

आम्ही पुढं गेल्यावर आमदार साहेबांनी कानात सांगितले, हे पण दोघे आमदारच आहेत, हे ऐकल्यावर मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. मला लक्षात आले कि त्यांना आमदार साहेबांनी ओळखले होते, म्हणुन मला गाडी थांबायला सांगितली. त्यांची गाडीत कुजबुज चालु होती मी कान देऊन ऐकत होतो तर एक आमदार बोलला अरे त्या मक्याला फोन करून विचार ते कुठे येणार आहे पोहोचले का ते. तर तो बोलला तुम्हीच करा ना फोन, अरे माझा बॅलन्स संपला हे, दुसरा बोलतो माझा पण बॅलन्स संपला हे, आणि तिसरा आमदार बोलतो माझ्या कडे तर फोनच नाही. मला त्यातील एका आमदाराने विचाले, साहेब तुमच्याकडे मोबाईल आहे का आम्हाला एक फोन करायचा आहे, मी म्हणालो हो आहे. धरा आणि त्यांनी फोन केला. समोरील व्यक्ती हि दादरला न येता लोणावळ्यात येणार होती. त्यामुळे आम्हाला लोणवल्यात सोडा असे बोलले. बोलता बोलता लोणावळा आले, लोणावळ्यात कुठे उतरायचे मी त्यांना विचारले तर आम्हाला रेल्वे स्टेशन वर सोडा असे बोलले, आणि मी गाडी त्या दिशेने वळवली आणि त्यांना रेल्वे स्टेशन वर सोडले. तिथे आम्हाला  चार बाकीच्या पक्षांचे आमदार भेटले,

  मग चर्च्या चालु असताना मला समजले कि त्या चार आमदारांकडे पुणे लोणावळा लोकल पुरते पैसे होते, त्यामुळं ते तिथपर्यंत लोकलने आले होते, हे ऐकल्यावर मला वाईट वाटलं. त्यांनी माझे आभार मानले आणि त्यांची चर्च्या सुरु झाली कि सध्या सर्वत्र कोरोना व्हायरस ने लोकांना ह्यइराण करून सोडले आहे. आज मार्केट ची परिस्थिती खुपचं वाईट झाली आहे. गरीब हातावर पोट भरणारे कुटुंब काय करील काय खातील अशी चिंता करू लागले. ज्यांना शेती नाही त्यांचे कर्ज कसे माफ करायचे, असे अनेक प्रश्न आणि विचार चालू होता. मी त्यांना चहा पाजण्यासाठी हॉटेल मध्ये घेऊन गेलो चहा पिऊन झाला  चहाचे पैसे मी देतो मी देतो असे एकमेका कडे बगुन खिशात काय कोणी हात घालत नव्हते माझ्या लक्ष्यत आले कि त्यांच्याकडे चहाचे देखील पैसे नाही, तेव्हा मीच भरले आणि त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो. माझ्या बरोबर आलेले आमदार साहेबांनी माझे आभार मानुन मला धन्यवाद देऊन त्यांच्यामध्ये सामील झाले,आता तुम्हाला मी हे का सांगतो आहे, असे असंख्य विचार येत असतील. तुम्ही विचार करत असाल कि आपले आमदार लोकांचे प्रश्न सोडवता सोडवता त्यांना किती अडचणी असतात ह्याचा आपण कधी विचारच केला नाही. मी देखील असाच सेल्फ फिश होतो पण जेव्हा मी त्यांच्या सोबत राहिलो तेव्हा मला समजले कि नाही त्यांना देखील गाडीची गरज आहे मोबाईल ची गरज आहे त्याच्याकडे पैसे नाही, महिन्याला २, ३ लाख रुपये काय पुरायचे हे, जरी अनुदान मिळत असेल तर काय झाले ते काय घरात वापरायचे काय. इलेक्शन च्या टाईमला खूप खर्च होतो त्यांचा कार्यकर्तेच खाऊन टाकतात सर्व पैसे बिचार्यांचे. ह्या सर्व अडचणी त्यांच्या बोलण्यातून  माझ्या लक्षात आले. मला एक गोष्ट समजली की जवळपास सर्वच आमदारांची अशीच अवस्था परिस्थिती आहे,काही आमदार  नागपुर , परभणी, बारामती, नाशिक मार्गे तर कोकणातले गोवा हायवे ने, विदर्भातले, मराठवाडा सर्व आमदार सेच लिफ्ट मागून नाहीतर चालतच मुंबई, नागपुर अधिवेशन गाठतात.

मित्रांनो जेव्हा हा सर्व प्रकार मी माझ्या डोळ्याने आणि स्वतःहा त्यांच्या बरोबर राहुन अनुभवला तेव्हा मी हे सर्व तुम्हाला सांगत आहे. 
मला सुरवातीला उर भरून आला, पण नंतर वाईट वाटलं, 

add 

आपल्या महाराष्ट्रातील जनता ही स्वतःची गाडी नसलेले आमदार का बरं निवडून देत असेल हा पण प्रश्न पडला,ही स्थिती अजितदादांच्या कानावर पडलीसाहजिकच अर्थमंत्री असल्याने त्यांनी या प्रकरणात लक्ष देण्याचे आश्वासन दिले आणि या अधिवेशनात आमदारांना गाडी घेण्यासाठी ३० लाख रु. बिनव्याजी देणार ही घोषणा केली,आंनद वाटला, तरी मोबाईल साठी अनुदान मिळावे अशी विनंती करतो ते पुढील आधिवेशनातं मंजूर होईल अशी आश्या बाळगतो. बाजारात महागड्या अल्टो, मारुती 800, वॅगन आर, क्विड अशा गाड्या न घेता आल्या तरी निदान कमीतकमी फॉरचूनर, इंनोवा सारख्या स्वस्तातल्या गाड्या घेऊन सर्व आमदार विकासाचा वेग वाढवतील याची मनोमन खात्री पटली.

[बिज़नेस लोन माफ़ होने के लिए निवेदन फॉर्म]

मी स्वतःहा एक छोटा धंदा करतो मला शेती नाही सरकारच्या कोणत्याही कर्ज माफीत बसत नाही माझ्यावर फायनान्स चे कर्ज कारण गव्हरमेंट बँक लोन देत नाही आज मार्केट चे कंबरडे मोडले शेरमार्केट भयानक कोसळे मोठ्या मोठ्या कंपन्या संपल्या आमच्या सारख्या छोट्या छोट्या दुकानदारांकडे कोण लक्ष्य देणार. तरी आम्ही गाडीत फिरतो पार्ट टाइम ड्राइवर चा जॉब करतो कारण फायनान्स चा EMI भरायचा असतो नाहीतर दंड आमच्याच बोकांडी आणि नंतर सिबिल खराब. असो. तरी आमच्या कडे लक्ष्य द्या असे म्हणायची देखील माझी इश्य झाली नाही कारण त्यांचे प्रश्न माझ्या पेक्ष्या पण मोठे होते. आम्हाला किंवा माझ्या सारख्या तरुणांना सरकारी कर्ज सुद्धा बँक देत नाही आणि ह्यांना बिनव्याजी ३० लाख वाव काय मजा हे राव... तरुण पीडी बँकात येजा करून हताश झाली ...... 

एकीकडे समस्त जग कोरोना व्हायरस शी लढत आहे आणि इकडे आपल्या आमदारांनी ३० लाख बिनव्याजी पोळी भाजली ..... 

[ग्रामपांचायत निवडणूक - जात पडताळणी प्रमाण पत्र बंधन कारक केले आहे]

माझी विनंती आहे कि ह्या २-३ महिने खाजगी तसेच सरकारी सहकारी बँक किंवा पतसंस्था किंवा फायनान्स चे EMI हप्ते भरण्यास सवलत मिळावी कारण सर्वच भारत आज ह्या आजाराने त्रस्त झाला आहे मग लोन चे हफ्ते कुठून भरणार माझ्या विचारांशी किती जण सहमत आहे त्यांनी कंमेंट करावी किंवा हा मेसेज शक्य तेव्हडा फॉरवर्ड करावा आणि आशाच नाव नवनवीन प्रश्नांवर वाच्या फोडणारे लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे ... No comments:

Post a Comment